शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले आफ्रिकन पटखेळाचे कातळशिल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:54 IST

रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ...

रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर साफसफाई करताना दीपगृह परिसरात हे शिल्प आढळल्याचे संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले.हे पटखेळाचे चिन्ह सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून, प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यावर दिसल्याचा दावा बने यांनी केला आहे. मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडीसारख्या आकाराचे दोन शिल्पही दिसली आहेत.गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांचीही मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून, त्यावर १२ पट आहेत तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत. तसेच या ठिकाणी एक पूर्ण वर्तुळ असून, दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात.संशोधन होणे गरजेचेमंकाळा पटखेळाची आढळलेली चिन्हे आफ्रिकन आहेत. त्यामुळे त्याकाळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापारासाठी व जलमार्गाने आले होते का, याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही बने यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड