शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By मनोज मुळ्ये | Updated: May 10, 2023 13:03 IST

सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले

रत्नागिरी : आपणच जगातील एकमेव प्रवक्ते आहोत, अशा थाटात कुणालाही सल्ला देणार्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती आहेत, याचा विचार करावा. राजकारणात भान असणे आवश्यक आहे, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी आज, बुधवारी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांचा समाचार घेतला. खासदार राऊत यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावर मंत्री सामंत यांनी जोरदार हल्ला केला.महाविकास आघाडीची मोट ज्या शरद पवार यांनी बांधली, त्यांच्यावरच आता टीका केली जात आहे. सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले आहे. त्यामुळे त्याचे राऊत यांनी आत्मचिंतन करावे, असे सामंत यांनी सांगितले.आतापर्यंत जे आम्हाला सल्ले देत होते, तेच आता शरद पवार यांनाही सल्ले देत आहेत. त्यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राने पाहिला आहे. प्रत्येकाच्या पक्षात वाकून बघायचे, हा काय प्रकार आहे, अशा शब्दात पवार यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण आम्ही जे पूर्वीपासून सांगत होतो, तेच आता शरद पवारही सांगत आहेत. यांची दखल घेत नाही, असे पवार यांनी सांगितले आहे आणि तेच महत्त्वाचे आहे, असे सामंत यांनी सांगितले.

पवारांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसिद्ध होत असल्याने अनेकांना दु:ख होते. सकाळी साडेनऊ वाजताही तेच होते. यावर शरद पवार यांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला आहे. तो म्हणजे हे जे काही बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करा, असे पवार यांनी म्हटले आहे. तेच बरोबर आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

यांचे सर्व खोके एकनाथ शिंदेंनी बंद केलेएकनाथ शिंदे यांनी काही खोके कर्नाटकला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा समाचार घेताना मंत्री सामंत म्हणाले की, दहा महिन्यात यांना खोकल्याशिवाय काही दिसलेले नाही. यांचे सर्व खोके एकनाथ शिंदे यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यांना स्वप्नातही खोकेच दिसत आहेत. जे खोके घेत होते, जे महानगरपालिकेमध्ये बोके होते, त्यांचा सर्व चरितार्थ थांबल्यामुळे आता त्यांची चिडचिड होत आहे. त्यामुळे या नैराश्येतूनच सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद होत आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार