रेलिंगवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:58+5:302021-03-20T04:30:58+5:30

राजापूर : रेलिंगवरून खाली पडल्याने शहरानजीकच्या शिळ भंडारवाडी येथील रवींद्र रामजी बिर्जे (५५) या प्रौढाचा डोक्याला गंभीर मार लागून ...

Adult dies after falling from railing | रेलिंगवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

रेलिंगवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

राजापूर : रेलिंगवरून खाली पडल्याने शहरानजीकच्या शिळ भंडारवाडी येथील रवींद्र रामजी बिर्जे (५५) या प्रौढाचा डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.

रवींद्र बिर्जे यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी शिवाजीपथ रस्त्यालगत कोदवली नदीपात्रात आढळला. याबाबत स्थानिकांनी राजापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. बिर्जे यांना मद्याचे व्यसन होते, गुरुवारी रात्री ते शिवाजीपथ रस्त्यावरील रेलिंगवरून खाली पडले असावेत व त्यातच त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Adult dies after falling from railing