चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST2021-07-15T04:22:22+5:302021-07-15T04:22:22+5:30

चिपळूण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची ...

Adult dies after being swept away in flood waters in Chiplun | चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

चिपळूण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

विकास शांताराम खडपेकर (४८, रा. वाघिवरे, चिपळूण) असे बडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे नदी - नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे वाघिवरे नदीची पाणी पातळीही वाढली आहे. या नदीवर खडपेकर हे सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेनंतर नदी परिसरात त्यांचा शोध घेतला असता, ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.

Web Title: Adult dies after being swept away in flood waters in Chiplun