शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दत्तकपुत्र भाजपला बुडवतील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राणेंना टोला

By संदीप बांद्रे | Updated: February 17, 2024 17:22 IST

चिपळूण : भाजपमध्ये बाहेरून आलेले दत्तकपुत्रच पक्ष चालवत आहेत. एक दिवस हेच दत्तकपुत्र भाजपला बुडवतील. भाजपची त्या दृष्टीने वाटचाल ...

चिपळूण : भाजपमध्ये बाहेरून आलेले दत्तकपुत्रच पक्ष चालवत आहेत. एक दिवस हेच दत्तकपुत्र भाजपला बुडवतील. भाजपची त्या दृष्टीने वाटचाल सुरू असून राणे यांच्या कृतीतून ते प्रकर्षाने जाणवले. टायगर इज कमिंग असे म्हटले जात होते. परंतू टायगर मैदान सोडून आधीच पळून गेला, लोकसभेला निवडणुकीतून देखील त्यांनी पळ काढलाच आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. तसेच अंत्यत खालच्या पातळवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर पोलिसांनी कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्रकार परिषद घेऊन निलेश राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध केला. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले, टायगर इज कमिंग ची केलेली बॅनरबाजी ही राड्याचे द्योतक होते. आमदार जाधवांन उत्तर देण्यासाठी अथवा राडा करण्यासाठी सभा घेतली, हे यातून स्पष्ट झाले आहे. सुरवातीपासून राणे हे उद्धव ठाकरे व पक्षाच्या नेत्यांवर अर्वाच्च शिवराळ भाषेत बोलत होते. त्याचेच उत्तर जाधव यांनी कणकवली येथे दिले. राजकारणात या गोष्टी चालत असतात. परंतू कायदा हातात घेणे अत्यंत चुकीचे आहे. राणेंच्या कृतीतून लोकशाही धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अशा गोष्टीला भाजप खतपाणी घालणार असेल तर ते दुर्देव आहे. गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात घाणेरडी भाषणे कोणाची झालेली नाही किंवा एैकलेली नाहीत. आगामी कालावधीत निवडणूका होणार आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था धाब्यावरबसवून वाटेल तसे भाजपनेते वक्तव्य करीत सुटले आहेत. राणेंकडून जिल्ह्यात शांतता भंग करण्याचे काम सुरू असून ते भाजपकडून जाणीवपुर्वक घडवले जात आहे. त्यास पोलिसांनी वेळीच आळा घालावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काळात मोठ्या घटना घडतील, पोलिसांनी वेळीच खबरदारी बाळगून राणेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संतोष पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपा