नगर परिषदांवर प्रशासकीय राजवट
By Admin | Updated: July 6, 2014 01:06 IST2014-07-06T01:02:13+5:302014-07-06T01:06:07+5:30
शनिवारपासून प्रशासकीय कारभार सुरू

नगर परिषदांवर प्रशासकीय राजवट
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांवर आज, शनिवारपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. विद्यमान नगराध्यक्षांची मुदत शनिवारी संपल्यामुळे आजपासून निवडणूक होईपर्यंत याच पद्धतीने कामकाज चालणार आहे. बहुतांश ठिकाणी प्रांताधिकारी यांच्याकडेच अधिकार देण्यात आले आहेत.
नगर परिषद नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची मुदत आज संपली. त्यामुळे आता लवकरच निवडणूक प्रक्रिया होणार हे निश्चित झाले आहे. रत्नागिरीमध्ये हा कार्यभार प्रांताधिकारी प्रसाद उकार्डे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)