शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला प्रशासकीय मान्यता, धरण फुटल्याने २३ लोकांचे गेले होते बळी 

By संदीप बांद्रे | Updated: March 6, 2024 19:00 IST

कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात

चिपळूण : जलप्रलयात उद्धवस्त झालेल्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला राज्य शासनाने अखेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. ६२ कोटी ७४ लाख रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले असून पुनर्बांधणीचे काम करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण कामाचे चित्रीकरण करण्यात यावे असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. तब्बल पाच वर्षानंतर हा प्रश्न मार्गी निघाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण २ जुलै २०१९ रोजी रात्री अचानक फुटले आणि येथील भेंदवाडीत जलप्रलय आला. त्यामध्ये २२ घरे वाहून गेली, तर २३ लोकांचे बळी गेले. या धरणफुटीमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. तत्कालीन मंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी तिवरे येथे भेट देऊन पाहणी केली व मदतीचे हात देखील पुढे केले होते. त्याचवेळी येथील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन अलोरे येथे त्या कुटुंबांना घरे देखील देण्यात आली. तर काही कुटुंबे अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत.अशा परिस्थितीत आमदार शेखर निकम यांनी तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाचा अहवाल मागवण्यात आला होता. धरण दुरुस्त न करता त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली होती. परंतु पुन्हा विषय रखडला. मात्र आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि शासनाने या कामाला ६२ कोटी ७४ लाख इतका निधी मंजूर केला.दरम्यान ५ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिवरे धरण पुनर्बांधणीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासंदर्भात काही अटीशर्ती लादण्यात आले आहेत. विशेष म्हणजे धरणाचे काम पूर्णपणे चित्रीकरणात करण्यात यावे, तसेच संबंधित तज्ञ अधिकाऱ्यांनी कामावर दररोज उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. आता या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण