अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:41+5:302021-09-18T04:33:41+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभर रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परिक्षित यादव यांना बढती देण्यात आली ...

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव रुजू
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभर रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परिक्षित यादव यांना बढती देण्यात आली आहे. ते गुरुवारी या पदावर रुजू झाले.
यादव हे अहमदनगर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाल्याने ते रत्नागिरी जिल्हा परिषदेत हजर झाले आहेत. त्यांचे स्वागत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम, खजिनदार समीर इंदुलकर, विजय पोकळे, सुनील कांबळे, वीरेश खानविलकर, संतोष शिवलकर, किरण वाडेकर, दिनेश सीनकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पद स्वीकारल्यानंतर परिक्षित यादव यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचीही भेट घेतली.