शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:12 IST

नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टबाबत काय कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक गुरुवारी मुरुडमध्ये दाखल झाले आहे. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर पदाचा गैरवापर करून सीआरझेडचा भंग केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्राच्या एका पथकाने सीआरझेडबाबत दापाेली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी केली आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.हे आदेश देण्यात आल्यानंतर पुढे काय कारवाई झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण खात्याचे पाच जणांचे पथक गुरुवारी मुरुडमधल्या रिसाॅर्टवर दाखल झाले आहेत.या पथकामध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. साई रिसाॅर्टप्रमाणे सी कोच रिसाॅर्टचीही चौकशी या पथकाकडून केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.राज्य पर्यावरण विभाग व केंद्र पर्यावरण विभाग अशा दोन्ही टीम प्रथमच एकत्र पाहणीसाठी आल्या आहेत. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात माहिती घेतली.साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कारवाई थांबलीच होती. आता सरकार बदलल्यानंतर या कारवाईला गती आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परब