जिल्ह्यात एका दिवसात नव्याने ६२२ कोरोना रुग्णांची भर; २९ मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:53+5:302021-05-12T04:32:53+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६२२ नव्या रुग्णांची भर पडली असून तब्बल २९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली ...

जिल्ह्यात एका दिवसात नव्याने ६२२ कोरोना रुग्णांची भर; २९ मृत्यूची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६२२ नव्या रुग्णांची भर पडली असून तब्बल २९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७,८०३ एकूण रुग्ण झाले असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४४ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सापडलेल्या एकूण ६२२ रुग्णांपैकी आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १९६ तर ॲंटिजन चाचणीत २२५ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांतील आधीचे २०१ रुग्ण जाहीर करण्यात आले आहेत. एकूण रुग्णांपैकी रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक ३६२ इतकी रुग्ण संख्या आहे.
जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २९ नोंदविण्यात आली आहे. यात मंगळवारचे १७ आहेत. यात खासगीतील ४ आणि सरकारी रुग्णालयातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आधीच्या १२ रुग्णांच्या मृत्यूंचीही नोंद मंगळवारी करण्यात आली. सध्या मृत्यूंची एकूण संख्या ८४४ इतकी झाली आहे.
रुग्णसंख्या वाढू लागल्याने बाधित रुग्णांची टक्केवारीत वाढ झाली असून १६.७३ टक्के झाली असून मृत्यूदरही ३ टक्क्यांवर गेला आहे. Adding 622 new