लॉकडाऊनमध्ये बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST2021-05-06T04:34:18+5:302021-05-06T04:34:18+5:30
रत्नागिरी : वेळेच्या मर्यादेनंतरही दुकानाचे शटर बंद करून आतून विक्री सुरूच ठेवणाऱ्या रत्नागिरीतील दहा व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली ...

लॉकडाऊनमध्ये बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी : वेळेच्या मर्यादेनंतरही दुकानाचे शटर बंद करून आतून विक्री सुरूच ठेवणाऱ्या रत्नागिरीतील दहा व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली आहे. या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात आला.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी ग्राहकांना वेळ ठरवून बोलाविण्यात येत आहे. शिवाय रमजान ईद तोंडावर असल्याने खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत. त्यामुळे दुकानदार शटर बंद ठेवून आतून विक्री व्यवहार सुरू ठेवत आहेत. याची माहिती मिळताच, नगरपरिषदेकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. अशा दहा व्यापाऱ्यांना दंड करण्यात आला आहे. रस्त्यावर बसून भाजी, फळे विकणाऱ्यांनाही हटविण्यात आले आहे. गुरुवारी नगरपरिषदेकडून कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
...............
नगरपरिषदेकडून जनतेला व विक्रेत्यांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही छुप्या पध्दतीने व्यवहार सुरू आहेत. यामुळे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे तत्काळ व्यापाऱ्यांनी अशी विक्री थांबवावी. ग्राहकांनीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. अन्यथा शहरात प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कठोर निर्बंध लावावे लागतील.
- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी नगरपरिषद.