रत्नागिरीत नियम न पाळणाऱ्या ५ दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:35+5:302021-04-09T04:33:35+5:30
तन्मय दाते लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेअंतर्गत ...

रत्नागिरीत नियम न पाळणाऱ्या ५ दुकानांवर कारवाई
तन्मय दाते
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेअंतर्गत काही दुकानांना मुभा देण्यात आली आहे. या दुकान मालकांनाही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली. रत्नागिरीत नियम न पाळणाऱ्या ५ दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. ज्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये मुुभा देेण्यात आली आहे त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या दुकान मालकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना काेराेनाचे नियम सांगणे बंधनकारक आहे. तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालूनच दुकानात प्रवेश देणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये ५ पेक्षा अधिक लोक असतील तर अशा लोकांवरही कारवाई करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. बुधवारी अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेल्या ५ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. वाघमारे पुढे म्हणाले की, नागरिकांनी पण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक नियमांचे पालन नाही करणार अशा लोकांवरही पाेलीस कारवाई करणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.