शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खेडशी येथील खून प्रकरणातील आरोपीला एक वर्षाने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:46 IST

Khedshi murder case, Accused arrested, ratnagiri, police रत्नागिरी शहराजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळा वर्षीय तरुणीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक वर्षानंतर नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर (३५) याला अटक केली आहे.

ठळक मुद्देखेडशी येथील खून प्रकरणातील आरोपीला एक वर्षाने अटकसोळा वर्षीय मैथिली गवाणकर हिचा खून, आरोपीचा शोध घेणे होते आव्हान

रत्नागिरी : शहराजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळा वर्षीय तरुणीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक वर्षानंतर नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर (३५) याला अटक केली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये मोडा जंगलांमध्ये मैथिली हिचा खून झाला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा सुगावा लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासात यश आले असून, या खुनामागचे कारण लवकरच पुढे येणार आहे.मैथिली गवाणकर ही मोडा जंगलांमध्ये बकऱ्या चरविण्यासाठी गेली असता कोणीतरी अज्ञाताने डोक्यात जड वस्तूने मारून तिला ठार मारले होते. हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी याप्रकरणी पोलीस पथके तयार करून त्यांना सूचना दिल्या होत्या. गुन्हा दाखल करून एक वर्षाचा कालावधी होऊनही आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने तरीही खेडशी गावातील स्थानिक लोकांशी संपर्क व जवळीक साधून गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर खेडशी भंडारवाडी येथील राहणारा नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर याला अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी मोरे, पांडुरंग गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, राजू भुजबळराव, मिलिंद कदम, सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, अपूर्वा बापट, चालक संजय जाधव, पोलीस नाईक अरुण चाळके, रमीझ शेख, अमोल भोसले, बाळू पालकर, गुरू महाडिक यांनी पार पाडली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी