देवरुखात प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST2021-03-31T04:32:26+5:302021-03-31T04:32:26+5:30

देवरुख : येथील गादी कारखाना महाडिक थांबा येथे राहणारे मिठाईलाल बाबूलाल बन्सी (वय ५०) यांचे चक्कर येऊन निधन झाले ...

Accidental death of an adult in Devrukha | देवरुखात प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

देवरुखात प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

देवरुख : येथील गादी कारखाना महाडिक थांबा येथे राहणारे मिठाईलाल बाबूलाल बन्सी (वय ५०) यांचे चक्कर येऊन निधन झाले आहे.

याबाबत देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, बन्सी यांची मुलगी अर्चना निसाद यांनी याबाबतची खबर दिली आहे. बन्सी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश राज्यातील भाईसाईनगर तालुका इठवा जिल्हा सिद्धार्थनगर येथील आहेत. कामानिमित्त ते देवरुख येथे राहत होते. थंडी-ताप आल्याने त्यांच्यावर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. घरी आल्यानंतर ते शौचालयात जात असताना गल्लीत पडले. त्यांना परत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत सोमवारी मालवली. याची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

देवरुख पोलीस स्थानकात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल डी. एस. पवार करीत आहेत.

Web Title: Accidental death of an adult in Devrukha