ओणी येथे अपघात, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:52+5:302021-07-03T04:20:52+5:30

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोल पंपासमोर इनोव्हा कार व पल्सर दुचाकी यांच्यात धडक होऊन ...

Accident at Oni, both seriously injured | ओणी येथे अपघात, दोघे गंभीर जखमी

ओणी येथे अपघात, दोघे गंभीर जखमी

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोल पंपासमोर इनोव्हा कार व पल्सर दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या दुचाकीस्वार विजय ठुकरूल (२८) व त्यांच्या मागे बसलेले काशिराम मासये (५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले आहे.

या अपघातातील इनोव्हा कार ही ओणी येथील पेट्रोल पंपाजवळ आली असता, पल्सर दुचाकी (एमएच ०३, बीआर २८१४) ही पेट्रोल पंपाच्या बाहेर पडताना इनोव्हा कारची तिला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये दोन्हीही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर इनोव्हा कारचालकाने तत्काळ दोन्ही जखमींना ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेले. याठिकाणी डॉ. नागेश स्वामी, डॉ. पूजा गुरसाळे व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Accident at Oni, both seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.