भाेस्ते घाटात अपघात, रसायनाची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:29+5:302021-06-01T04:24:29+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील तीव्र उतारावर कंटेनरने रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरला पाठीमागून धडक ...

भाेस्ते घाटात अपघात, रसायनाची गळती
खेड : मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील तीव्र उतारावर कंटेनरने रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात ३१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात टॅंकर चालक मच्छिंद्र नवनाथ आंधळे (४५, रा. बीड) हा गंभीर जखमी झाला असून, रस्त्यावर माेठ्या प्रमाणात रसायन पडले हाेते.
कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पुढे असणाऱ्या टॅंकर (एमएच ०४, जेयू ४११४)ला धडक दिली. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच मृत्यूंजय पथकाचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारी, खेड पोलीस, कशेडी महामार्ग पोलीस, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे दीपक देवळेकर व सहकारी घटनास्थळी आले व त्यांनी पाण्याचा फवारा मारून रसायन धुवून रस्ता माेकळा केला.