शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

रत्नागिरीच्या हद्दवाढ कार्यवाहीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 11:39 AM

Ratnagiri Nagar Parishad - रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठीचा झोन प्लॅन आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. हा आराखडा सहायक संचालकांकडून मंजूर होऊन आल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चिपळूण, खेड आणि दापोली या शहरांच्या हद्दवाढीच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या हद्दवाढ कार्यवाहीला वेगआराखडा मंजूर होऊन आल्यानंतर हरकती मागविणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठीचा झोन प्लॅन आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. हा आराखडा सहायक संचालकांकडून मंजूर होऊन आल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चिपळूण, खेड आणि दापोली या शहरांच्या हद्दवाढीच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी  पत्रकार परिषदेत दिली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील हद्दवाढीचा प्रस्ताव दहा वर्षांपासून पुढे आला आहे. हद्दवाढ झाली तर लोकसंख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पार्किंग सुविधा, मोकळे एैसपैस रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधा चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे शहरीकरण झाल्याने वर्षानुवर्षे रखडलेला विकास होण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेला हद्दवाढीसंदर्भात २०१४-१५ साली जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात आला होता. त्यातून आता आराखडा तयार करण्यात आला असून तो अंतिम टप्प्यात आहे. यात शहरातील भाट्ये, तित्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तीन शहरांसाठी आराखड्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा नियोजनाचा निधी ४८५ कोटींपर्यंत वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत ८ रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. थिबा पॅलेस, टिळक स्मारक यांच्या दुरुस्तीसाठी परवानगी दिल्याचेही ते म्हणाले.सोमवारी लोकशाही दिनात ३१ अर्ज दाखल झाले असून त्यात अनेक तक्रारी अनधिकृत बांधकामाबाबत आहेत. ग्रामविकास आणि नगरविकास यांनी बांधकाम अधिकारांबाबत ग्रामपंचायत आणि प्रांत यांना दिलेल्या वेगवेगळ्या अधिकारामुळे संभ्रमाची अवस्था होती. २०१८ च्या नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार, कारवाईचे आदेश प्रांताकडे दिले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषदRatnagiriरत्नागिरी