शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: संगमेश्वरात कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून तरुणावर तलवारीने वार, गंभीर जखमी

By अरुण आडिवरेकर | Updated: April 19, 2023 11:41 IST

या घटनेनंतर साखरपा गावात तणाव

रत्नागिरी : कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा (ता. संगमेश्वर) येथील सागर वैद्य (वय-२२) या तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१८) घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी साखरपा दूरक्षेत्राला घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीच्या सामन्यादरम्यान त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला होण्याची काही प्रेक्षकांनी सूचना केली. यातूनच वादाला सुरुवात झाली. परंतु, त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला होता. मात्र संबंधित व्यक्तींच्या डोक्यात राग खदखदत होता.ज्या तरुणाबद्दल राग होता, ज्याच्यावर हल्ला करायचा होता, तो तरुण जी गाडी चालवत होता तीच गाडी घेऊन सागर गेला होता. परंतु, ती व्यक्ती वादातील असल्याचा समज करून घेऊन १० जणांनी तलवारीने सागर वैद्य याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सागर जखमी अवस्थेत कोसळला. त्याला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेनंतर साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, मोठा जमाव साखरपा दूरक्षेत्रावर धडकला होता. तर रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका हॉटेलवर हल्ला झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर साखरपा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस