शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

Accident: वांझोळे नजीक अपघातात लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 3:45 PM

देवरुख : एका वळणावर खासगी लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास देवरुख ...

देवरुख : एका वळणावर खासगी लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास देवरुख साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडला. रवींद्र शिवराम शिवगण (वय-४५) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार, 'माचाळची राणी भैरी भवानी ट्रॅव्हल्स' नंबर (एमएच ०४ जीपी १२९९) ही मुंबईहून साखरप्याच्या दिशेने जात होती. तर वांझोळे गावातील रवींद्र शिवगण हा तरुण देवरुखला कामाला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाला होता. दरम्यान, रिक्षाला ओव्हरटेक करताना लक्झरी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रॅव्हल्स चालकावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात