चिपळुणात शिकारीला गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू, दोघेजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 14:16 IST2022-03-13T14:15:51+5:302022-03-13T14:16:17+5:30

मृत्यू झालेला 23 वार्षीय तरुण हा एका सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

A young man who went hunting in Chiplun was dead due to firing and two others were seriously injured | चिपळुणात शिकारीला गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू, दोघेजण गंभीर

चिपळुणात शिकारीला गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू, दोघेजण गंभीर

चिपळूण : तालुक्यातील तळसर परिसरातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची व त्याचे अन्य दोघे सहकारी गंभीर जखमी झाल्याची जोरदारपणे चर्चा सुरु आहे. मात्र या घटनेविषयी अद्याप पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही. 

चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरातील तीन मित्र क्रिकेट स्पर्धेसाठी जातो, असे सांगून शनिवारी रात्री घराबाहेर पडले. त्यानंतर हे तिघेजण नजीकच्या तळसर परिसरातील जंगलात एका गाडीने शिकारीला गेले. याचवेळी गाडीत ठेवलेल्या बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन मित्र देखील गंभीरपणे जखमी झाले. या घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

मृत्यू झालेला 23 वार्षीय तरुण हा एका सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याला तळसर येथून शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. तसेच अन्य दोघांपैकी एकावर सावर्डे परिसरातील रुग्णालयात, तर अन्य दुसऱ्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेविषयी पोलीस यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: A young man who went hunting in Chiplun was dead due to firing and two others were seriously injured