शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: नाेकरीचे आमिष दाखवत तरुणाला १२ लाखांचा गंडा, बनावट कागदपत्रेही पाठविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:31 IST

रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलत असल्याचे भासवून देऊड - चिंचवाडी (ता. रत्नागिरी) येथील तरुणाला नाेकरीचे आमिष दाखवत तब्बल १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.याप्रकरणी राहुल देवजी खापले (२२) याने फिर्याद दिली आहे. त्याच्या माेबाइलवर राेशनसिंग नावाच्या व्यक्तीचा फाेन आला. आपण नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलत असल्याचे सांगून महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये नाेकरी लावताे, असे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या हितेश नावाच्या व्यक्तीच्या युनियन बॅंकेच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने २ लाख ३८ हजार ८८८ रुपये भरायला सांगितले.कनक, कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर या व्यक्तींनी कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली. या सर्वांनी संगनमताने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये डिप्लाेमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागात निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कंपनीतील विविध प्रक्रियेची कारण देत अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या कॅनरा बॅंकेतील खात्यात टप्प्या-टप्प्याने १० लाख ०१ हजार ८५१ रुपये भरण्यास सांगितले.मात्र, नाेकरी लागल्याचा बनाव झाल्याचे लक्षात येताच आपली १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांना फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली असून, राेशन सिंग, कनक कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.खाेटी कागदपत्रे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये डिप्लाेमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागात निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी माेबाइलद्वारे व ई-मेलद्वारे नाेकरी डाॅट काॅम व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या नावाचा वापर करून कागदपत्र पाठविण्यात आली. ही कागदपत्रे खाेटी असल्याचे नंतर समाेर आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम