शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष; संगमेश्वरातील महिलेला सव्वा दोन लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:45 IST

देवरुख : ‘वर्क फ्राॅम हाेम’चे आमिष दाखवून संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली - बाैद्धवाडी येथील एका महिलेला तब्बल २ लाख २९ ...

देवरुख : ‘वर्क फ्राॅम हाेम’चे आमिष दाखवून संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली - बाैद्धवाडी येथील एका महिलेला तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीता प्रेमदास गमरे (वय ४६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही घटना २३ जून २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडली आहे. नीता गमरे यांना साेशल मीडियावर ‘वंशिका’ नावाच्या अकाऊंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफरला होकार दिल्यानंतर, ‘कस्टमर सपाेर्ट’ नावाच्या ग्रुपमधील हीना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (ॲडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर सुमित यांनी त्यांना वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यासही त्यांना सांगण्यात आले.फिर्यादी गमरे यांनी त्यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख २९ हजार १३२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. मात्र, पैसे भरल्यानंतरही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. उलट, संशयितांनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) नुसार चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.