शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधात चार जिल्ह्यातील पोलिस, संचालकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:57 IST

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती

चिपळूण : ‘टीडब्ल्यूजे’ संस्थेत राज्यातील शेकडाे पाेलिसांनी गुंतवणूक केल्याचा संचालकांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचे रत्नागिरीचे पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. तसेच संस्थेचा संचालक समीर नार्वेकर याच्या शाेधात चार जिल्ह्यातील पाेलिस असून, लवकरच ताे पाेलिसांच्या हाती लागेल, असेही पाेलिस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.टीडब्लूजे या संस्थेने चिपळूणमध्ये हायटेक कार्यालय उभारून सुरुवातीला लोकांना भुलभुलैय्या दाखवला. या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा तसेच गुंतवणुकीचे अनेक फायदे दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे लाभही देण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत ‘टीडब्ल्यूजे’ चिपळूणमध्ये लोकप्रिय ठरू लागली. परंतु, अचानक गुंतवणूकदारांना लाभ मिळण्यास उशीर होऊ लागला. संचालक सतत संपर्काच्या बाहेर राहिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आणि पोलिस स्थानकात फिर्याद दाखल होऊ लागल्या. काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिस स्थानकावर गुंतवणूकदारांनी धडक देत, संताप व्यक्त करत आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यानंतर साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान, याबाबत पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडीओ फार जुना असल्याचे सांगितले. या व्हिडीओबाबत आपण खातरजमा केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्या शाेधात चार जिल्ह्यांतील पाेलिस आहेत. लवकरच ताे पाेलिसांच्या तावडीत सापडेल, असेही त्यांनी सांगितले. ताे अन्यत्र गेल्याचा संशय असून, त्या दृष्टीने शाेध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हटलंय व्हिडीओमध्येसंचालकाचा एक व्हिडीओ साेशल मीडियावर जाेरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये संचालकाने टीडब्ल्यूजेमध्ये एकूण ११ हजार गुंतवणूकदार असून, त्यांपैकी राज्यातील शेकडो पोलिस असल्याचे म्हटले आहे. चिपळूण पोलिस स्थानकातील बहुतांश पोलिस कर्मचारीही आपले गुंतवणूकदार असल्याचेही म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Police hunt for TWJ director after video sparks investment scandal.

Web Summary : Police seek TWJ's director, Samir Narvekar, across four districts after a video alleging police investments surfaced. Investors claim fraud as returns stalled. Authorities confirm the video is old, but the search continues.