शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Accident: बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू, चिपळूणातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:11 IST

चिपळूण : आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश प्रभाकर गुरव (वय-४३) असे मृत ...

चिपळूण : आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश प्रभाकर गुरव (वय-४३) असे मृत तरूणाचे नाव आहे.  चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे आज, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महेश हा वेळंब येथील रहिवासी आहे.       याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महेश हा पहाटेच्या सुमारास गुहागरवरून चिपळूण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघाला होता. तो चिपळूण बाजारपेठेत येताच बॅ. नाथ पै चौकात त्याला एका आयशर गाडीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये महेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर संबंधीत आयशर चालक गाडीसह तेथून पसार झाला. यावेळी काहींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो हाती लागला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सबंधीत गाडीचा शोध पोलीस घेत आहे. सबंधीत आयशर चालक हा रत्नागिरीहून मुंबईकडे आंब्याची वाहतूक करणारा होता, असा अंदाज पाठलाग करणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात