शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात मालक स्वतःच नौका हलवणार, मिरकरवाडा बंदराला पोलिस छावणीचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:18 IST

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात ...

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात बंदरावर आले. परंतु शुक्रवारी सर्वच नौका बंद असतात. त्यामुळे जेटीवर शाकारलेल्या नौकांच्या मागे इतर अनेक नौका उभ्या होत्या. त्यामुळे शाकारून ठेवलेली एकही नौका हलवता आली नाही. मात्र शाकारून ठेवलेल्या नौकांच्या माालकांनी पुढील दोन दिवसात आपल्या नौका हलवतो असे सांगितले आहे.काही मच्छीमार नौकांची १० मे पासूनच मासेमारी बंद झाली आहे. मासेमारी बंद झालेल्या या नौका मिरकरवाडा बंदरातील जेटीवर प्लास्टिक कापड आच्छादून उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या शाकारलेल्या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करून बंदरात परतणाऱ्या नौकांना अडचण होऊ लागली. त्यांच्या नौकांवरील मासळी उतरविणे व साहित्य नौकांमध्ये चढविणे जिकिरीचे होऊन गेले. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा प्राधिकरणाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी या नौकांच्या मालकांना नोटीस बजावून त्या नौकांचा इतर नौकांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभ्या करण्यास सांगितले. परंतु या नौकामालकांकडून नोटीसला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात शाकारलेल्या नौका हटविण्याचे नियोजन झाले.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली.शाकारून ठेवलेल्या नौका मालकांना बोलावून त्यांच्या नौका जेटीवरून हलवून दुसरीकडे उभ्या करण्यास सांगितले. ही कार्यवाही न झाल्यास फौजदारी कारवाईसह नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही असा इशाराही मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

मालकांचे आश्वासनशुक्रवार असल्याने नौकांची मासेमारी बंद असल्याने या सर्व नौका बंदरात उभ्या होत्या. त्यामुळे शाकारलेल्या नौका सुरू करून दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे या नौकामालकांनी पुढील दोन दिवसात नौका हलवण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार