शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळुणात कोसळलेल्या भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: July 13, 2024 12:34 IST

चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात काल, शुक्रवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी सकाळी ...

चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात काल, शुक्रवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थी सिद्धांत प्रदीप घाणेकर मूळचा दापोली देहगाव येथील रहिवासी आहे. विद्यार्थ्यांची शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेमुळे डीबीजे महाविद्यालय बंद ठेवण्यात आला आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत रस्तालगत विविध ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आल्या. डिबीजे महाविद्यालयाच्या आवारातही महामार्ग लगतच संरक्षित भिंत उभारण्यात आली होती. त्या आरसीसी संरक्षक भिंतीवर आणखी जांभ्या स्वरूपाची संरक्षक भिंत डीबीजे महाविद्यालयाने उभारली होती. या भिंतीखाली एकाने वडापावची हातगाडी उभारली होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेहमी उठबस असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही वडापावची गाडी बंद होती. तरी देखील काही विद्यार्थी तेथे बसण्यासाठी जात असत. अशातच जांभ्याच्या संरक्षक भिंतीचे काही दगड शुक्रवारी सकाळी अचानक कोसळले. किरकोळ घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु संबंधित विद्यार्थी हा महाविद्यालयातून सायंकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती. अशातच शनिवारी सकाळी तो भिंतीखाली चिरडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.तात्काळ तेथील दगड हटवून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. संबंधित विद्यार्थी हा मूळचा दापोली देहगाव येथील रहिवासी असला तरी तो शिक्षणासाठी लोटे येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणcollegeमहाविद्यालयDeathमृत्यू