शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

Ratnagiri- गावे एका बाजूला अन् मार्ग दुसऱ्या बाजूला, महामार्गावरील फलकांमुळे प्रवाशांची ‘दिशा’ चुकतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:37 IST

प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या चौपदरीकरणामुळे कोकणातील महामार्ग चर्चेत आलेला आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी महामार्गावरील मैलांच्या दगडावरील शहरांची नावेही चुकीच्या पद्धतीने लिहून मराठीची मोडतोड करण्यात आल्यानंतर आता वालोपे आणि कळंबस्ते येथे उभ्या करण्यात आलेल्या मार्गफलकावर गावे एका बाजूला असून त्यांची दिशा भलत्या बाजूला दाखवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. चुकीची दिशा दाखवणारे हे फलक वादात सापडले आहेत.महामार्गावर काही दिवसांपूर्वी चिपळूण ऐवजी ‘चिपलून’ व पेणचे ‘पेन’ असे नामफलक लिहिल्याने मराठीची करण्यात आलेल्या मोडतोडीवर संताप व्यक्त होत आहे. असे असताना आठ दिवसांपूर्वी परशुराम ते खेरशेत या ३६ किलोमीटर अंतरात चिपळूण टप्प्यातील वालोपे आणि कळंबस्ते येथे मोठे मार्गफलक बसवण्यात आले आहेत. वालोपे येथील या मार्गफलकावर मुंबईकडे जाण्याच्या मार्गावर एक फलक उभारला आहे. त्यावर परशुराम उजव्या बाजूला असताना दिशा मात्र गुहागरकडे दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास करणारी वाहने ही फरशी तिठा येथे उतरून गुहागरच्या दिशेने वळत आहेत.

अशाच पद्धतीचा फलक कळंबस्ते येथे उभारण्यात आला आहे. येथे बसवण्यात आलेल्या मार्गफलकावर सावर्डेची दिशा खेड हद्दीतील पंधरागावकडे दाखवण्यात आल्याने प्रवासी वाहने कळंबस्तेतून पंधरागावकडे जात आहेत.एकूणच महामार्गावरील या मार्ग फलकांमुळे प्रवासी वाहनांचा गोंधळ उडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या महामार्गावर हवाई पाहणी करणार असल्याने घाईगडबडीत हे मार्गफलक कंत्राटदार कंपनीने उभारल्याचे समजते. मात्र सुरू असलेल्या गोंधळाबाबत कंपनीने अजूनही दखल घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कंत्राटदार कंपनी कशापद्धतीने आपली मनमानी करत आहे हे वालोपे आणि कळंबस्ते येथे उभ्या केलेल्या मार्गफलकावरून दिसत आहे. गावे एका बाजूला आणि त्यांची दिशा भलत्या बाजूला दाखवण्यात आल्याने गोंधळ उडत आहे. कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी या नामफलकांची तत्काळ दुरुस्त करून घ्यावी. - शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा