शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील चुनाकोळवणमध्ये आढळले दुर्मिळ "नेवर" प्रजातीचे फुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 11:53 IST

विनोद पवार  राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाहून सुमारे 25 किमी अंतरावर असणारे चुनाकोळवण हे गाव "सवतकडा" आणि "परिटकडा" या ...

विनोद पवार राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाहून सुमारे 25 किमी अंतरावर असणारे चुनाकोळवण हे गाव "सवतकडा" आणि "परिटकडा" या दोन नितांत सुंदर धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहेच. आता या गावात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या "नेवर" प्रजातीच्या झाडाचे फुल आढळून आल्याने चुनाकोळवण गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.चुनाकोळवण गावात श्री लक्ष्मी नारायण, श्री लक्ष्मीकांत, श्री कालीमाता आणि श्री शंकर अशा चार मंदिराचा समुह असून त्यांच्या मधोमध एक तलाव आहे. माजी मुख्याध्यापक व पर्यावरणप्रेमी आनंद केशव उर्फ AK मराठे ही मंदिरे पाहण्यासाठी गेले असता त्यांना याठिकाणी फुलांचा लोंबता गुच्छ दिसला. त्याचे फोटो काढून त्यांनी कुडाळ येथील अभ्यासक डॉ. मानसी करंगुटकर, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ. शरद आपटे आणि भारतातील फुलांचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांच्याशी चर्चा केली.डॉ.करंगुटकर यांनी हे फुल Barringtonia Racemosa असे शास्त्रीय नाव असणाऱ्या नेवर नावाच्या झाडाचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. डॉ.आपटे यांनीही हे झाड नेवर /तीवर किंवा समुद्रफळ यापैकी एका प्रजातीचे असू शकते असे प्रतिपादन केले. डॉ. इंगळहळीकर यांनी मात्र हे खारफुटी मॅनग्रोव्हजच्या संगतीत वाढणाऱ्या समुद्रफळ या नितांतसुंदर व दुर्मिळ झाडाचे फुल असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. सामान्यपणे खाऱ्या पाण्याच्या कडेला वाढणाऱ्या या झाडाची Back Mangrove प्रकारात मोडणारी जात गोड्या पाण्यातही वाढू शकते असेही मत त्यांनी व्यक्त केले.चार दिवसांपूर्वीच "सोहोळा" चे फुल प्रकाशात आणल्यानंतर दोनच दिवसात आणखी एका दुर्मिळ फुलाचा शोध लावल्याने मराठेसरांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून जिज्ञासू अभ्यासकांनी चुनाकोळवणला भेट देऊन या फुलाची प्रत्यक्ष पहाणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ओणीमार्गे जाणारा रस्ता प्रचंड खराब असल्याने मुंबई गोवा महामार्गवरील मंदरूळ फाट्यावरून जाणे अधिक सुकर असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी