शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे वाऱ्यासाठी खिडकी ठेवली उघडी, डोक्याला दगड लागून रेल्वे प्रवाशी झाला गंभीर जखमी 

By अरुण आडिवरेकर | Updated: May 31, 2023 14:30 IST

उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

रत्नागिरी : उन्हामुळे गाडीची खिडकी उघडी ठेवल्याने डोक्यात दगड बसून रेल्वे प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना तिरुन्नलवेली - जामनगर एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी (३० मे) सकाळी ९:३० वाजता निवसर (ता. रत्नागिरी) रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अब्दुल मज्जीद अबूबक्कर काडबेन (५५, रा. सध्या माहीम- मुंबई मूळ रा. केरळ) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. अब्बूल मज्जीद काडबेन हे मुंबईमध्ये माहिम येथे काम करतात. मंगळवारी ते तिरुन्नवेल्ली जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या मागे साधारण निवसर रेल्वे स्टेशनच्या आसपास डोंगरातून दगड खाली आला आणि चक्क खिडकीतून त्यांच्या डोक्याला लागला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. बोगीमधील इतर प्रवाशांनी त्यांना डोक्याला पट्टी बांधून रत्नागिरी रेल्वे स्टेशनपर्यंत आणले.रेल्वे पोलिसांनी तात्काळ दखल घेत बोगीत येऊन अब्दुल मज्जीद काडबेन यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांच्या डोक्याला पाच-सहा टाके पडले आहेत. आता त्यांची तब्बेत स्थिर आहे. प्रवासात उन्हाळ्यामुळे रेल्वेची खिडकी उघडी ठेवल्याने हा प्रकार घडला.रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावर डोंगराळ भागात काही ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी अजूनही जाळ्या बसवण्यात आलेल्या नसून रेल्वेच्या जाण्या-येण्याच्या हादऱ्याने दगड खाली येत अशा दुर्घटना घडत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे