शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मोबाईलसाठी एका प्रवाशाने मंगला एक्सप्रेस थांबवली, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

By संदीप बांद्रे | Updated: July 25, 2024 19:35 IST

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा किमती मोबाईल गाडीतून पडताच त्याने रेल्वेची चेन ...

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा किमती मोबाईल गाडीतून पडताच त्याने रेल्वेची चेन ओढली आणि रेल्वे थांबवली. त्यानंतर काही वेळाने ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. ही घटना चिपळूण हद्दीतील धामणदिवी बोगद्यानजिक गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.कोकण रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा काही प्रवासी रेल्वे बोगीच्या दरवाज्यात अथवा खिडकीजवळ मोबाईल घेऊन बसतात. तेथेच चार्जीगची व्यवस्था असल्याने एकाचवेळी काही मोबाईल तेथे चार्जिंगसाठी ठेवले जातात. अशाच एका प्रवाशाच्या हातातील किमती मोबाईल अचानक रेल्वेगाडीतून  खाली पडला. त्याने वेळ न घालवता तत्काळ रेल्वेची चेन खेचली आणि गाडी थांबवली. धामणदिवी बोगद्यातून बाहेर आल्यावर गाडी थांबली होती. त्यामुळे सुरुवातीला गाडी नेमकी कशासाठी थांबवली हे कर्मचाऱ्यांनाही समजू शकले नाही. मात्र याविषयीची माहिती तत्काळ रेल्वेच्या यंत्रणेला देण्यात आली. त्यामुळे काहीशी तारांबळ उडाली. शिवाय बोगद्याजवळ थांबलेली रेल्वे पाहून स्थानिक ग्रामस्थानीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एका प्रवाशाचा मोबाईल रेल्वेतून खाली पडल्याची खात्री पटताच काही वेळाने ही गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेpassengerप्रवासी