शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील २१ फुटी विठ्ठल मूर्तीला आच्छादन, स्ट्रक्चरल ऑडिटसह रेडिओलॉजिस्ट करणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:21 IST

१ काेटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीच्या साच्यातील गॅपमध्ये काही भागाला पाेपडे सुटले

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यानात चार महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या २१ फुटी विठ्ठल मूर्तीला आच्छादन घालण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जात हाेते. या मूर्तीच्या साच्यातील गॅपमुळे काही भागाला पाेपडे सुटले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी या मूर्तीला आच्छादन घालण्यात आल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, शहरातील सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून पूर्ण स्कॅनिंग करून घेतले जाणार आहे.मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शासनाने राज्यातील सर्वच पुतळ्यांबाबत दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर परिषद, महानगरपालिकांना सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी शहरातील सहाही पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

माळनाका येथील शामराव पेजे यांचा पुतळा, मारुती मंदिर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लक्ष्मी चौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, थिबा पाॅइंट येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, माळनाका येथील शिर्के उद्यानातील विठ्ठलाची मूर्ती, अशा सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. आता रेडिओलॉजिस्टकडून पुतळ्यांचे संपूर्ण स्कॅनिंग केले जात आहे. यामध्ये पुतळ्याला काही भंग झाला असले तर जे. जे. स्कूल संस्थेकडून दुरुस्ती करून घेतली जाणार आहे.दरम्यान, माळनाका येथे १ काेटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीच्या साच्यातील गॅपमध्ये काही भागाला पाेपडे सुटले आहेत. त्यामुळे या मूर्तीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरातील सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. आता मूळ पुतळ्यांचे रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून स्कॅनिंग करून त्यांच्या मजबुतीची खात्री केली जाणार आहे. - यतिराज जाधव, पालिका बांधकाम विभागाचे अभियंता

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी