शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: कोट येथे उभारणार राणी लक्ष्मीबाईंचे भव्यदिव्य स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:55 IST

भविष्यात या स्मारकाकडे पर्यटकांचा ओघ कसा वाढेल या दृष्टीने हे स्मारक बांधण्यात येणार

लांजा : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई याच्या सासरी कोट येथे भविष्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा शुभारंभ सोहळा पार पडत आहे. हा दुग्धशर्करा योग असल्याचे प्रतिपादन रणरागिनी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट लांजाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी कोट येथे केले. कोट येथे किल्ल्याच्या स्वरूपात भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.भारतीय इतिहासात थोर वीरांगणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचे सासर आणि माहेर लांजा तालुक्यातील कोट आणि कोलधे या दोन गावांत आहे. मात्र, आजवर कित्येक वर्षे उलटून गेली, तरीही लांजासह देशभरात राणीचे भव्यदिव्य स्वरूपातील स्मारक उभे राहिलेले नाही. ही खंत लक्षात घेऊन रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट लांजाच्या माध्यमातून कोट गावी भव्यदिव्य स्वरूपातील स्मारक उभारले जाणार आहे.या स्मारकासाठी राणीचे वंशज असलेले दत्तात्रय नेवाळकर यांनी आपल्या स्वमालकीची ८३ गुंठे जागा ट्रस्टसाठी दिली आहे. त्यानुसार, या स्मारकाचा शुभारंभ सोहळा पार पडला.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड, तसेच उद्घाटक म्हणून राणी लक्ष्मीबाईंचे वंशज दत्तात्रय नेवाळकर हे उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कोटचे माजी सरपंच शांताराम उर्फ आबा सुर्वे, तसेच स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा देणारे मोहन डिके, तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, गावकर अंकुश नारकर, विजय दिवाळे, नामदेव बोलये, अनंत बोलये, संदीप बोलये, वासुदेव बोलये, सखाराम नारकर, सोना पालकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.भविष्यात या स्मारकाकडे पर्यटकांचा ओघ कसा वाढेल या दृष्टीने हे स्मारक बांधण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सांगितले. ट्रस्टचे सरचिटणीस महेंद्र साळवी यांनी सूत्रसंचलन व आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी