शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:01 IST

बाजारात हापूसचा तुटवडा भासणार

रत्नागिरी : हवामानातील बदलांमुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. गेले चार-पाच दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून, दिवसा कडाक्याचे ऊन पडत आहे. थंडी नसल्याने आता कुठे सुरू झालेली मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका आहे. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प आहे. पावसाळ्यात झाडांना आलेला मोहोर कीडरोगापासूच वाचविण्यात ज्या शेतकऱ्यांना यश आले आहे, त्या झाडांचा आंबा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे, मात्र त्याचे प्रमाण किरकोळ असेल.यावर्षी पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. पहिल्या टप्प्यात काही झाडांना मोहोर आला, परंतु हे प्रमाण अवघे दहा टक्के होते. त्यातही कीडरोग, बुरशी, तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वेळोवेळी झाला. काही बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणी करून मोहोर व झालेली फळधारणा वाचवली आहे. हा आंबा दुसऱ्या टप्प्यात २० मार्चनंतरच बाजारात येणार आहे. दि. २० मार्च ते १५ एप्रिलपर्यंत हा आंबा बाजारात येईल, त्यानंतर मात्र बाजारात हापूसचा तुटवडा भासेल. एकूणच हवामानातील बदलांमुळे दुसऱ्या टप्प्यात मोहोर प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे बागायतदारांसाठी हे फार मोठे संकट आहे.मागच्या दोन आठवड्यांत कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया किरकोळ प्रमाणात सुरू झाली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा थंडी गायब झाली आहे. पहाटे थोडाफार गारवा असला, तरी दिवसा मात्र कडकडीत ऊन आहे. या उष्म्यामुळे आता मोहोर प्रक्रिया पुन्हा थांबून पुन्हा कलमे पालवीकडे वर्ग होण्याचा धोका आहे.

सध्याच्या मोहोरावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. उष्मा कमी होऊन थंडी कायम असेल, तर तो आंबा १० मे नंतरच बाजारात येईल. त्यामुळे फेब्रुवारीनंतरच आंबा हंगामाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. तुलनेने अपेक्षित दर प्राप्त होत नसल्याने बागायतदारांची आर्थिक गणिते मात्र विस्कटत आहेत.

यावर्षी थंडीचे प्रमाण असमान राहिल्याने मोहोर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने पिकाच्या संरक्षणासाठी महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान