राजापूर : तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदेवाडीतील जुबेदा अन्वर खान यांच्या घरात अंदाजे ४ ते ५ महिन्याचा बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याने काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. काल, गुरुवारी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.हा बिबट्या जुबेदा खान यांच्यावर हल्ला करणार त्याचवेळी त्याठिकाणी काशिनाथ जाधव आले. त्यांनी बिबट्याला पळवून लावत असताना बिबट्याने काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यात जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या बिबट्या सोबत मादी बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी याच भागात सहा महिन्यापूर्वी बलवंत शिर्के यांचा बैल, पाडा रानात चरण्याकरिता नेले असता बिबट्याने मारला होता. त्यानंतर आठ दिवसात प्रभाकर लिंगायत यांच्या गाय, पाडी वर बिबट्याने हल्ला चढविला होता.याबाबत वनविभागाकडे लेखी तक्रार केली आहे. यापूर्वी अनेकवेळा भटक्या श्वानांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. गावातील काही शेतकरी जनावरे व शेळ्या मेंढ्या चरण्याकरिता नेतात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:46 IST