शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील महामार्गावर उभे राहतेय ‘जंक्शन’, गुंतागुंतीची वाहतूक सुटसुटीत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 18:09 IST

गणेशोत्सवामुळे घाई

चिपळूण : गेले कित्येक दिवस रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाग पॉवर हाऊस नाक्यातील चौपदरीकरणाचे काम पावसाचा जोर कमी होताच पुन्हा सुरू झाले आहे. चिपळूण शहरात येणाऱ्या वाहनांसाठी येथे ‘जंक्शन’ उभारण्यात येणार आहे. काँक्रिटीकरणानंतर पॉवर हाऊस येथील गुंतागुंतीची वाहतूक काहीशी सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजीनगरपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलच्या इथे उतरणार आहे. तर पाग परिसरातही गेल्या काही महिन्यांपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या येण्या-जाण्याचा आणि रस्ता ओलांडण्याचा प्रश्न सुटावा यासाठी अखेर येथे जंक्शन उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पावसाचा जोर कमी झाल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

गणेशोत्सवामुळे घाईगणेशोत्सव जवळ येऊन ठेपलेला असल्याने येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चौपदरीकरणातील गुंतागुंत आणि अडचणीत राहिलेली कामे प्राधान्याने हाती घेतली जात आहे. त्यामध्ये पॉवर हाऊस येथील शिल्लक राहिलेल्या चौपदरीकरणातील काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू केले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्णत्वास जाऊन येथे चारही लेन सुरू केल्या जातील, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.

विरोधामुळे पेचप्रांताधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय, पाग बौद्ध कॉलनी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पागझरी हायस्कूल, कास्करआळी, गोरिवलेआळी, पाग मराठी शाळा, उघडा मारुती मंदिर परिसर, गोपाळकृष्णवाडी, जोशीआळी, रानडेआळी, मिरगलआळी, पॉवर हाऊस, गुहागर बायपास, पागनाका, पागमळा या वर्दळीच्या ठिकाणांचा विचार करताना पाग पॉवर हाऊस येथे अंडरपास मंजूर होता. मात्र, विरोधामुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर येथे उड्डाणपुलासाठीही प्रयत्न झाला. मात्र, त्यासही विरोध झाल्याने प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग पेचात पडले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गChiplunचिपळुण