शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: परशुराम घाटातील गॅबियन वाॅलला भगदाड, भरावाची माती भर वस्तीत गेल्याने दलदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:55 IST

पावसामुळे धोका अधिक वाढला

चिपळूण : मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या भागात उभारलल्या जात असलेल्या गॅबियन वॉलसाठी टाकलेला भराव मुसळधार पावसात पायथ्यालगतच्या पेढे गावात वाहून गेल्याने भरवस्तीत चिखल व दलदल निर्माण झाली आहे. तसेच या वाॅलला भगदाड पडले असून, ही वाॅल काेसळण्याची भीती निर्माण झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील मध्यवर्ती भागात लोखंडी जाळीच्या आधारे गॅबियन वॉल उभारली जात आहे. सुमारे ९० मीटरहून अधिक लांबीची ही भिंत दगड व मातीच्या मिश्रणातून उभारण्यात येत आहे. आत्तापर्यंत या भिंतीचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही बरेचसे काम बाकी असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात भरावाची माती टाकण्यात आली आहे.मात्र, आता पावसाच्या पाण्यासोबतच ही माती वाहून डोंगराच्या पायथ्याला असलेल्या वस्तीत येऊ लागली आहे. त्यामुळे भरवस्तीत दलदल निर्माण झाली आहे. घरांच्या आजूबाजूला चिखल साचल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करूनही दखल घेतलेली नाही. आता पावसामुळे ही परिस्थिती हाताबाहेर गेली असून, त्याचा धोका अधिक वाढला आहे.

सवतसडा धबधबा आणि घाटातील वरून येणारे पाणी हे फरशी तिठा येथे येऊन साचते. फरशी पुलाखाली खाेलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येथील वाहतूक बंद ठेवावी लागते.

मे महिन्यातील पावसातही परशुराम घाटातील माती गावच्या शेतात आली होती. ही माती काढण्याची मागणी केल्यानंतर काही प्रमाणात ती काढण्यात आली. सातत्याने मागणी करूनही ठेकेदार कंपनीकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास गणेश विसर्जन करणेही कठीण होणार आहे. ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. - आरूषी शिंदे, सरपंच, पेढे