शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: लोटेतील आरोमा कंपनीत आग लागून वायुगळती, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By अरुण आडिवरेकर | Updated: May 5, 2023 17:19 IST

चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली

सुनील आंब्रेआवाशी : चिलिंग प्लॅन्टला प्रक्रिया करताना पाण्याची कमतरता भासल्याने तापमानात वाढ होऊन रियक्टरला आग लागून वायुगळती झाली. ही घटना खेड तालुक्यातील घटना लोटे औद्योगिक वसाहतीतील आरोमा कंपनीत शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी ११:३० वाजता घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. सुदैवाने यामध्ये काेणीही जखमी झालेले नाही.लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील इतर कंपनीचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करण्याचे काम आरोमा कंपनी करते. कंपनीत शुक्रवारी सकाळी चिलिंग प्लॅन्टला प्रक्रिया करण्याचे काम सुरू हाेते. यावेळी कंपनीत मालकांसह चार कामगार हाेते. चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली. त्यामुळे धुराचे प्रचंड लोळ हवेत उसळले. दरम्यान, याचवेळी वायुगळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले हाेते. आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलासह खेड व चिपळूण नगरपालिकाचे अग्निशमन दलाला बाेलावण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये काेणतीही दुर्घटना झालेली नसल्याने साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वसाहतीतील अनेक कारखानदारांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी धाव घेतली. तसेच खेड व लोटे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. त्यांच्याकडून पंचनाम्याचे काम सुरु हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग