विनाेद पवारराजापूर : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला बुधवारी (५ जुलै) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या भीषण आग लागली. या आगीत पवार यांचे दुकान पूर्णतः जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बाजूला असणारे साने यांचेही ओम सर्व्हिसेस हे दुकान जळून नुकसान झाले आहे.मध्यरात्री दुकानाला आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणली. राजापूर नगरपरिषदेचा अग्नीशमन बंब व राजापूर शहरातील कोठारकर यांचा पाण्याचा टॅंकर वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या दोन्ही दुकानाला लागून साने याचे घर आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्यापही समजलेले नाही.
राजापुरात मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग, लाखोचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:51 IST