शहरं
Join us  
Trending Stories
1
"दोन्ही हात वर करून सांगतो..."; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर
2
"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण
3
Petrol-Diesel Price: यावर्षी कमी होणार का पेट्रोल-डिझेलची किंमत? ५० डॉलर्सपर्यंत येऊ शकतात कच्च्या तेलाचे दर
4
समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले
5
देव करो पैसे न देणारी जमात नष्ट होवो...! शशांक केतकरला पाठिंबा देत प्रसिद्ध अभिनेत्रीची कमेंट
6
बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले...
7
वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रेन वॉश अन् १५ वर्षीय मुलगा बनला गुप्तहेर; लष्करी तळांचे व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले
8
६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने पहाटेच दिला दणका; लष्कराची विमानं आकाशात, नागरिकांची उडाली धांदल
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचं कच्चं तेल; वारंवार देताहेत भारताला धमकी आहे, एकंदरीत गणित बदलेल का?
10
निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...
11
११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुहेरी योग; 'या' एका उपायाने मिळेल दुप्पट लाभ!
12
टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...
13
अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज!
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर हे पाच देश? व्हेनेझुएलानंतर वाढली खळबळ
15
पाकिस्तानविरोधात दोन युद्धे लढली, स्क्वाड्रन लीडर म्हणून रिटायर झाले; सुरेश कलमाडींचा रणभूमी ते राजकारणापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
16
मोठ्या घसरणीसह शेअर बाजाराची सुरुवात; सोन्या-चांदीच्या दरात तेजी, ऑईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
17
संतोष धुरींना मेसेज अन् CM फडणवीसांसोबत ३० मिनिटे चर्चा; नितेश राणेंनी मनसेचा शिलेदार भाजपमध्ये कसा आणला?
18
आईचा निरोप घेतला अन् लेक थेट रेल्वेसमोर धावली! शेवटच्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून चुकेल काळजाचा ठोका
19
US Tariff Threat: कच्च्या तेलाच्या खेळात अडकला भारत; अमेरिका आणि रशियादरम्यान कोणा एकाची नाराजी ओढवून घ्यावी लागणार का?
20
"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: ‘रो-रो’वरील कलंडलेला ट्रक पडता-पडता वाचला, लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:42 IST

या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली

खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एक मालवाहू ट्रक एका बाजूला कलंडल्याचे लाेकाे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर ही गाडी खेड रेल्वेस्थानकात थांबवून हा ट्रक पुन्हा बांधण्यात आला. लाेकाे पायलटच्या जागरूकतेमुळे हा ट्रक खाली पडता-पडता वाचला. अन्यथा माेठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवार, २ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.काेकण रेल्वेमार्गावरून कोलाड येथून मडगावकडे मालवाहू ट्रक घेऊन रो-रो शुक्रवारी जात हाेती. रो-रो सेवेमधील एक मालवाहू ट्रकवरील लोड एका बाजूला सरकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रकही थाेडासा एका बाजूला कलंडला हाेता. हा प्रकार लाेकाे पायलटच्या लक्षात आला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही रेल्वे तत्काळ थांबवण्यात आली. ट्रक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत तत्काळ सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.घटनास्थळी ट्रकमधील माल पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. सेफ्टी बेल्ट लावून ट्रक सुरक्षित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.सर्व सुरक्षा उपाय पूर्ण झाल्यानंतर आणि मालवाहू ट्रक पूर्णपणे सुरक्षित केल्यानंतर रो-रो सेवा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alert loco pilot saves tilted truck on Ro-Ro in Ratnagiri.

Web Summary : A loco pilot's alertness averted a major accident in Ratnagiri. A truck on a Ro-Ro service tilted, but the pilot stopped the train at Khed station, preventing it from falling. Safety measures were taken, and the Ro-Ro service resumed after securing the truck. Rail traffic remained unaffected.