शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बिबट्याच्या तोंडातून बछडा निसटला अन् आईपासून दुरावला, भेट घडविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:11 IST

तज्ज्ञ अधिकारी येणार

लांजा : रस्ता ओलांडताना मादी बिबट्याच्या तोंडातून १५ दिवसांचा बछडा सुटून रस्त्यावर पडल्याची घटना रविवारी (दि. ८) रात्री ७:३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यामुळे आई व बछड्यांची ताटातूट झाली. हा बिबट्या लांजा - काजरघाटी मार्गावरील पूनस संसारी फाटा येथे रस्त्यावर पडलेला हाेता. या बछड्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून, ताे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या आईचा शाेध वनविभाग घेत आहे.लांजा-काजरघाटी मार्गावरील पूनस संसारी फाट्याच्या उतारावर जंगलमय भागातून मादी बिबट्या आपल्या १५ ते २० दिवसांच्या बछड्याला तोंडातून घेऊन रात्री रस्ता ओलांडत हाेती. त्याचवेळी तिच्या तोंडातून बछडा रस्त्यावर पडला. त्याचवेळी गाड्यांची वाहतूक असल्याने या बछड्याला घेऊन जाता आले नाही. त्यामुळे ताे तिथेच रस्त्यावर पडलेला हाेता. रस्त्यावर बछडा असल्याचे कळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली हाेती. या घटनेची माहिती मिळताच वनपाल सारिका फकीर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, बाबासाहेब ढेकरे यांनी धाव घेतली.वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून ग्रामस्थांना बाजूला केले. तसेच त्या बछड्याला त्याचठिकाणी ठेवून बिबट्या येताे का याची वाट पाहण्यात आली. मात्र, पहाटेपर्यंत बिबट्या न आल्याने वनविभाग बछड्याला घेऊन लांजा येथे आले. साेमवारी (दि. ९) सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून हा बछडा सुस्थितीत असल्याचे सांगितले.

तज्ज्ञ अधिकारी येणारया बछड्याला दूध, लिक्विड देण्यात येत आहे. तसेच या बछड्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी सातारा किंवा सांगली येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आईची भेट घडविण्याचा प्रयत्नमादी बिबट्या रस्ता ओलांडत असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा बछडा तिच्या तोंडातून निसटला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री वनविभागाकडून या बछड्याला पुन्हा त्याच जागी ठेवून आई व बछड्याची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग