शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

By मेहरून नाकाडे | Updated: May 25, 2023 14:26 IST

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रत्नागिरी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९६.०१ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने  राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले  असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.२० टक्केने निकाल घसरला आहे.  राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे मंडळाचा ९३.३४ टक्के तर कोल्हापूर मंडळाचा ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व कोल्हापूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल मुंबई मंडळाचा असून ८८.१३ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार २२ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १२ हजार ३२० मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.   मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.६० टक्के इतके आहे.  मंडळातून १३ हजार ६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १२ हजार ६७० विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.४१ टक्के आहे.  मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.८१ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार १३४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १७ हजार ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ हजार २५४ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ८ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आठ  हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा २.२९  टक्के इतका अधिक आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग