जिल्ह्यातील ९३ तलाठ्यांना मिळणार नवा लॅपटाॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:44+5:302021-04-09T04:33:44+5:30
जिल्हाभरातील ६५ मंडल अधिकाऱ्यांनाही गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा शोभना कांबळे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ...

जिल्ह्यातील ९३ तलाठ्यांना मिळणार नवा लॅपटाॅप
जिल्हाभरातील ६५ मंडल अधिकाऱ्यांनाही गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा
शोभना कांबळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण (लँड रेकार्ड माॅर्डनायझेशन) अंतर्गत तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या लॅपटाॅप खरेदीसाठी शासनाकडून निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९३ तलाठी आणि ६५ मंडल अधिकारी यांना या लॅपटाॅपचा लाभ मिळणार आहे.
मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया लॅंड रेकार्ड माॅर्डनायझेशन’ कार्यक्रमांतर्गत २०१७ साली तलाठ्यांना लॅपटाॅप देण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील एकूण ३९४ सजाच्या तलाठ्यांपैकी ३०१ जणांना लॅपटाॅप देण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ६५ मंडल अधिकाऱ्यांपैकी एकालाही लॅपटाॅप मिळाला नाही. याआधी देण्यात आलेल्या लॅपटाॅपपैकी काही लॅपटाॅप आता नादुरुस्त स्वरूपात आहेत.
आता पुन्हा तलाठी आणि मंडल अधिकारी यांचे लॅपटाॅप क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडण्यासाठी लॅपटाॅपच्या खरेदीकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता ९३ तलाठी आणि ६५ मंडल अधिकारी यांना लॅपटाॅपचा लाभ मिळणार आहे.
सर्वाधिक सातबारा
राज्यात सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यात २० लाख ८४ हजार ८३ सातबारा आहेत. तर गावांची संख्या १५३६ आहे. मात्र, एवढ्या गावांसाठी केवळ ३९३ तलाठी काम करत आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा कारभार असल्याने महसुली कामे हाेताना अडचणीचे हाेत आहे.
पूर्वीच्या लॅपटाॅपचे काय?
‘शासनाने २०१७ साली जिल्ह्यातील ३०१ तलाठ्यांना लॅपटाॅप दिले होते. चार वर्ष होत आल्याने त्यापैकी काही लॅपटाॅप बंद झाले आहेत. मात्र, इतर अजुनही चांगले आहेत.
33333
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ मंडल अधिकारी आहेत. अजुनही त्यांना लॅपटाॅप दिलेले नाहीत. आता शासनाने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटाॅप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधी मंजूर केला असून टेंडरही निघाले आहे. त्यामुळे त्यांनाही लॅपटाॅप मिळतील.
शासनाने १०१७ साली ३०१ तलाठ्यांना लॅपटाॅप दिले. तर काहींना प्रिंटरही दिले आहेत. आता त्यापैकी काही बंद आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात नव्या १०३ सजांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे साधारणत: ११ मंडल नव्याने तयार झाली आहेत. तलाठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्वांनाच लॅपटाॅप मिळाल्यास ताण येणार नाही.
उमाकांत देशमुख, चिटणीस, रत्नागिरी - सिंधुदुर्ग तलाठी संघ
शासनाने तलाठ्यांना लॅपटाॅप दिल्याने सातबारा संगणकीकरणाचे काम वेगाने होण्यास मदत झाली. त्याचबरोबर इतरही कामे लॅपटाॅपवर करता येतात. हे लॅपटाॅप चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळे यापैकी बिघाड झालेले लॅपटाॅप कमीच आहेत. शासनाने आता उरलेल्या तलाठ्यानांही लॅपटाॅप द्यावेत. त्यामुळे कामे अधिक गतीने होतील.
- संदेश घाग, सरपंच, मिरजोळे