रत्नागिरी जिल्ह्यात ९ टक्के पाणी दूषित
By Admin | Updated: July 23, 2014 21:53 IST2014-07-23T21:50:30+5:302014-07-23T21:53:50+5:30
साथीच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात ९ टक्के पाणी दूषित
रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये जिल्ह्यातील ९ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे पाणी शुध्दिकरणाची सूचना आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींना दिली आहे़
पाण्यामुळे अनेक आजार पसरतात़ त्यामुळे साथीच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ त्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच पाणी शुध्दिकरणासाठी तुरटी, मेडीक्लोरचा वापर करण्यात येतो़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पाणी तपासणी प्रत्येक महिन्यात करण्यात येते़ त्यासाठी विहिरी, तलाव, नळपाणी योजना व अन्य पाणी पुरवठ्याच्या साधनातून पाण्याचे नमुने ग्रामपंचायत तसेच आरोग्य केंद्रांमार्फत गोळा करण्यात येतात़
मागील महिन्यात जिल्हाभरातून २०७९ पाणी नमुने गोळा करण्यात आले होते़ त्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली़ त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, १९५ पाणी नमुने म्हणजेच ९ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़
तालुकानिहाय दूषित
पाण्याची टक्केवारी
मंडणगड१७
दापोली८
खेड११
गुहागर ५
चिपळूण११
संगमेश्वर ४
रत्नागिरी१२
लांजा ७
राजापूर१०