शहरं
Join us  
Trending Stories
1
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
2
ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
3
राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
4
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
5
"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी
6
"इंडस्ट्रीत लेखक नाही म्हणतात अन् आहे त्याला मानच देत नाहीत", चिन्मय मांडलेकरची खदखद
7
नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?
8
युक्रेनमधील भारतीय कंपनीवर रशियाचा हल्ला! २८ देशांसाठी वाईट बातमी; काय होतं उत्पादन
9
मामी-भाच्याची लव्हस्टोरी... दोनदा घरातून पळाले; मामाने अपमान करताच रचला भयंकर कट
10
कुटुंबीयांच्या संमतीने ठरलं तरी जोडप्याने पळून जाऊन केलं लग्न; कारण समजल्यावर व्हाल हैराण
11
कोण आहे मिस्ट्री वूमन, जी तहव्वूर राणाची बायको म्हणून भारतात राहत होती?; NIA चा शोध सुरू
12
..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?
13
युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान
14
जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण
15
...म्हणून शेतकरी सावकाराकडे जातो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हानं?
16
IPL 2025 : व्हॉट्सअ‍ॅप DP ला धोनीचा फोटो; मनी 'ध्रुव' ताऱ्यासारखं चमकण्याचं स्वप्न
17
‘मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक, हिंदू होडीमधून करताहेत पलायन’, ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर टीका 
18
न्यूनगंड अन् सोशल फोबिया; ओळखायचं कसं आणि काय करायचं?
19
शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय?
20
लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:48 IST

रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या ...

रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. गतवेळच्या आराखड्यापेक्षा यावर्षी ५०० काेटींची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सन २०२४-२५ चा आराखडा ३६० काेटींचा हाेता.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा नियाेजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतूदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. यावर्षीही ती होईल, असे सांगितले. ८६० कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून, राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणाने मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले.खासदार राणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वकष अर्थसंकल्प सादर करुन देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्याचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो, असे सांगितले.जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण केले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.

अभिनंदनाचा ठरावविधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे, पालकमंत्री उदय सामंत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या प्रस्तावाला खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिला. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के निधी खर्च केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlanning Commissionनियोजन आयोगguardian ministerपालक मंत्रीUday Samantउदय सामंत