संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली असून, आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मार्च २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे गर्डर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे जोड रस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत असून, पावसाळ्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. तातडीने केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली होती.या समितीच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यात बदल सुचवले होते. यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तिथे अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. नवीन रचनेनुसार सर्व पिअर व पिअर कॅपचे काम पूर्ण केले आहे. आता त्यावर उर्वरित गर्डर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन कार्यरत आहेत. त्यामुळे आता मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.पॉवर हाऊसचा प्रश्न सुटेनाचिपळूण हद्दीतील पाग पाॅवर हाऊस येथे असलेल्या चौकातून अजूनही ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी होत आहे, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.उड्डाणपुलाखाली आतापासूनच अतिक्रमणचिपळुणातील उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच काही ठिकाणी मोक्याच्या जागा पाहून तेथे हातगाडी व अन्य स्टॉलधारकांनी आतापासूनच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुलाच्या कामात अडथळे येऊ लागले आहेत. शिवाय या स्टॉलवर गर्दी होत असल्याने तेथे एखादा अपघात झाल्यास ते धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्लॅबचे काम दाेन महिन्यांतच पूर्ण हाेणारउड्डाणपुलासाठी टप्प्याटप्प्याने १८२ स्लॅब टाकावे लागणार आहेत. त्यापैकी ६२ स्लॅबचे काम पूर्णत्वास गेले असून, उर्वरित स्लॅबचे काम दोन महिन्यांतच पूर्ण केले जाणार आहे.
- पुलाची लांबी १,८४० मीटर
- रुंदी ४५ मीटर
- एकूण ४६ पिलर
Web Summary : Chiplun's Mumbai-Goa highway flyover is 82% complete, targeting March 2026 finish. Redesign after a collapse includes shorter spans. Powerhouse area faces safety concerns. Encroachments plague the construction site.
Web Summary : चिपलूण में मुंबई-गोवा राजमार्ग पर फ्लाईओवर का 82% काम पूरा, मार्च 2026 तक लक्ष्य। गिरने के बाद पुन: डिजाइन में छोटे स्पैन शामिल हैं। पावरहाउस क्षेत्र में सुरक्षा चिंताएं। निर्माण स्थल पर अतिक्रमण की समस्या।