कर्जाच्या आमिषाने ७० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:42+5:302021-09-02T05:07:42+5:30
खेड : तालुक्यातील कुळवंडी - बागवाडी येथील रोहन संजय चव्हाण या तरुणाला फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे आमीष ...

कर्जाच्या आमिषाने ७० हजारांची फसवणूक
खेड : तालुक्यातील कुळवंडी - बागवाडी येथील रोहन संजय चव्हाण या तरुणाला फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे आमीष दाखवत त्याच्याकडून ६९ हजार ८३० रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार खेड पोलिसात करण्यात आली आहे.
रोहन संजय चव्हाण याच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून तुम्हाला धनी फायनान्समधून कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी कागदपत्रे पाठवावीत, असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खेड बसस्थानकासमोर दुकानात दिलेल्या खात्यात रोहनला पैसे भरण्यास लावले. फिर्यादीने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी ६९ हजार ८३० रुपये भरले. मात्र, प्रत्यक्षात त्याला कोणतेही कर्ज मिळाले नाही. आपली फसवणूक झाली हे समजल्यावर याबाबत राेहन चव्हाण याने खेड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दिली आहे.