रत्नागिरीत काेराेनाचे ६९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:57+5:302021-09-11T04:32:57+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून, शुक्रवारी दिवसभरात ६९ बाधित नवे रुग्ण सापडले. तर ७८ रुग्ण बरे ...

69 new patients of Kareena in Ratnagiri | रत्नागिरीत काेराेनाचे ६९ नवे रुग्ण

रत्नागिरीत काेराेनाचे ६९ नवे रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून, शुक्रवारी दिवसभरात ६९ बाधित नवे रुग्ण सापडले. तर ७८ रुग्ण बरे झाले असून, तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये १,२७१ रुग्ण उपचारांखाली आहेत.

जिल्ह्यात ४,३४८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणीत ३८, तर ॲंटिजन चाचणीत ३१ रुग्ण सापडले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील एक रुग्ण, दापोलीतील ७, खेडमधील ४, गुहागरात ३, चिपळुणात २१, रत्नागिरीतील १८, लांजातील ३ आणि राजापुरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण ७६,७९७ रुग्ण झाले आहेत.

रत्नागिरी तालुक्यात दोघांचा, तर लांजात एकाचा असे तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. बाधितांच्या मृत्यूची संख्या २,३६९ झाली आहे. त्यांचा मृत्यू दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ७३,१५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२६ टक्के आहे.

Web Title: 69 new patients of Kareena in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.