रत्नागिरीत ६ हजाराचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:07+5:302021-09-02T05:07:07+5:30
रत्नागिरी : गुटखा व पान मसाल्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. ...

रत्नागिरीत ६ हजाराचा गुटखा जप्त
रत्नागिरी : गुटखा व पान मसाल्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. प्रशासनाने ३१ ऑगस्ट राेजी छापा टाकून सुनील लक्ष्मण रसाळ कीर्तीनगर - मजगाव राेड येथील साई किराणा अँड जनरल स्टाेअर्समधून ६,३८८ रुपयांचा साठा जप्त केला.
शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून छापा टाकण्यात येत आहे. त्यानुसार सुनील लक्ष्मण रसाळ यांच्या मालकीच्या दुकानात छापा टाकला. या धाडीत विमल पानमसाला, आरएमडी, तैमुर, पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण ६,३८८ रुपयांचा साठा जप्त केल, तसेच दुकान सीलबंद केले आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय नारगुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध अधिकारी प्रशांत गुंजाळ व दशरथ कांबळे यांनी केली. याबाबत रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.