नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचा ५६ वा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:48+5:302021-06-24T04:21:48+5:30

चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटीचा ५६ वा वर्धापन दिन सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यमान ...

56th Anniversary of Navkonkan Education Society | नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचा ५६ वा वर्धापन दिन

नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचा ५६ वा वर्धापन दिन

चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटीचा ५६ वा वर्धापन दिन सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यमान अध्यक्ष श्रीधर भिडे व संस्थेचे सर्व विद्यमान पदाधिकारी यांनी संस्थेची पायाभरणी करणारे डॉ. जी. एन. दातार, डॉ. एस. आर. बेहेरे आणि पिलुकाका जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपाध्यक्ष श्रीराम खरे, पद्माकर भागवत, प्रकाश केशव जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. जीवन रेळेकर, सेक्रेटरी माधव चितळे, नियामक समितीचे सदस्य अतुल चितळे, डॉ. दीपक विखारे, अविनाश जोशी, नीलेश भुरण, डॉ. शेखर मेहेंदळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. एस. चांदा, कार्यालय अधीक्षक लीना भाटिया, वरिष्ठ लिपिक विजय जाधव व महाविद्यालयातील काही मोजके प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 56th Anniversary of Navkonkan Education Society