शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साकवांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवेत तब्बल ५६ कोटी, पावसाळ्यात येते महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:46 IST

साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे

रहिम दलालरत्नागिरी : ग्रामीण भागातील दळणवळणात महत्त्वाची भूमिका असलेल्या साकवांची स्थिती दयनीय झाली आहे. जिल्ह्यात १९१ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून त्या साकवांवरून प्रवास करावा लागत आहे. या साकवांची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि नवीन साकवांसाठी ५६ कोटी २९ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे साकव मोडकळीस आल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात. या साकवांची दुरुस्ती होणे तसेच काही वाड्या-वस्त्यांवरील साकवांची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच काही गावांमध्ये नवीन साकवांची आवश्यकता आहे.  जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम विभागाने ८७ साकवांसाठी २४ कोटी रुपये तर चिपळूण बांधकाम विभागाने १०४ साकवांसाठी ३२ कोटी २९ लाख रुपये अशा एकूण ५६ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. यंदाचा पावसाळा भीतीच्या छायेत गेला. किमान पुढच्या पावसाळ्यासाठी तरी आतापासूनच त्याची तरतूद करण्याची अपेक्षा केली जात आहे.

संपर्काचे एकमेव माध्यमजिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे, वाड्या, वस्त्यांमधील नदी, नाले, ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्त्व येते. नादुरुस्त झालेल्या धोकादायक असलेल्या साकवांमुळे अनेक वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे ये-जा करताना हाल होतात. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या साकवांसाठी जिल्हा नियोजन समितीने जास्तीत जास्त निधी मंजूर करून तो वेळीच देणे आवश्यक आहे.

अशी आहे निधीची गरजरत्नागिरी विभाग - ८७ साकव,आवश्यक निधी- २४ कोटी,चिपळूण विभाग - १०४ साकव,आवश्यक निधी - ३२ कोटी २९ लाख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी